बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीला आठ दिवसांची ‘पॅरॉल’ रजा मंजूर

Bombay HC
  • भावाच्या निधनानंतर सात महिन्यांनी विनंती मान्य

मुंबई: मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेसंबंधीच्या खटल्यात जन्मठेप भोगत असलेल्या इसा ऊर्फ अन्जूम अब्दुल रझाक मेमन या सिद्धदोष कैद्याला त्याच्या भावाच्या निधनानंतर केल्या जाणाºया धार्मिक विधींना हजर राहण्यासाठी उच्च न्यायालयाने आठ दिवसांची आपातकालिन ‘पॅरॉल’ रजा मंजूर केली.

इसाचा भाऊ आणि याच खटल्यात शिक्षा झालेला आणखी एक सिद्धदोष कैदी यूसूफ मेमन याचे २६ जून रोजी निधन झाले होते. मुस्लिम रिवाजांनुसार मृत्यूनंतर ४० दिवसांनी केले जाणारे धार्मिक विधी कोरोनाच्या निर्बंधांमुळे करता आले नव्हते. आता निर्बंध शिथिल झाल्याने या विधींपैकी सर्वात महत्वाचा ‘फतेहा ख्वानी’ हा विधी शुक्रवार २९ जानेवारी रोजी केला जाणार होता. त्यावेळी उपस्थित राहता यावे यासाठी न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने इसाला ‘पॅरॉल’ मंजूर केला.

इसा नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे. भावाच्या मृत्यूनंतर लगेचच त्याने तुरुंग अक्षीक्षकांकडे ‘पॅरॉल’साठी अर्ज केला. अक्षीक्षकांनी त्याला तीन दिवसांचा ‘पॅरॉल’ मंजूर केला. परंतु पॅरॉलच्या काळातील त्याच्या पोलीस बंदबस्ताच्या खर्चापोटी दिवसाला ७० हजार रुपये या प्रमाणे रक्कम जमा करण्याची अट घालण्यात आली. याविरुद्ध इसाने न्यायालयात याचिका केली.

आता न्यायालयाने  जो ‘पॅरॉल’ मंजूर केला आहे त्यासाठी इसाला पोलीस बंदोबस्ताचा खर्च द्यावा लागणार नाही. या पॅरॉलच्या काळात इसा याने कुर्ला येथे आपल्या कुटुंबासोबतच राहावे आणि या आठ दिवसाच्या काळात कुर्ला पोलीस ठाण्यात दोन दिवस हजेरी लावावी, अशी अट घातली गेली.

इसा गेली २६ वर्षे तुरुंगात आहे. या काळात त्याला दोन वेळा पॅरॉलवर व दोन वेळा फलोॅ रजेवर सोडण्यात आले होते. या प्रत्येक वेळाी रजेची मुदत संपल्यावर तो स्वत:हून वेळेवर तुरुंगात परत आला होता, याचीही न्यायालयाने आताचा पॅरॉल मंजूर करताना नोंद घेतली.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER