अर्णबने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याने त्यांचा रिमांड विचाराधीन

Arnab Goswami

मुंबई : अन्वय नाईक (Anvay Naik) प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबल उडाली आहे. आज संध्याकाळी अर्णब यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या वकीलांनी त्यांचा रिमांड विचाराधीन असल्याचे सांगितले आहे.

आरोपी अर्णबने केलेलल्या असलेल्या आरोपात तथ्य नसल्याने त्यांचा रिमांड विचाराधीन असल्याचे वकीलांनी एका पत्राद्वारे सांगितले आहे.

गोस्वामी यांच्यासह इतर 2 आरोपींनासुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फोरोज शेख आणि नितेश सारडा अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत.

दरम्यान तिनही आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आपलं म्हणण मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ दिला होता. ‘अ समरी’ रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा तपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, पोलिसांवर असा ठपका ठेवत कोर्टानं पोलिसांना अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडी नाकारली आहे.

अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्तापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही. तसंच आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे, असं म्हणत कोर्टानं पोलिसांना कोठडी देण्यास नकार दिला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी मुंबईतून अटक करून आणल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना जवळपास 1 वाजता अलिबाग न्यायालयासमोर सादर केलं.

तिथं अर्णब गोस्वामी यांनी रायगड पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला. त्यानंतर न्यायाधीशांनी गोस्वामी यांची फेर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज गोस्वांमी यांची सायंकाळी वैद्यकीय तपासणी झाली व मारहाणीच्या आरोपात तथ्य नसून आरोपीचा रिमांड विचाराधीन असल्याचे सांगितले आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER