‘बापूं’च्यामते हिंदी हे देशाचे कुंकू : योगी आदित्यनाथ

yogi

नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी संदर्भात केलेल्या वक्त्व्याची पाठराखण करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, हिंदी ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असन ते देशाचे कुंकू आहे, असे मत खुद्द महात्मा गांधी यांनीही व्यक्त केले होते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा व्हावी असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केल्यानंतर देशभर वादळ निर्माण झाले. दक्षिणेतल्या अनेक राज्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्याला विरोध केला होता. हिंदीच्या वापरासंबंधात बोलताना ते म्हणाले, देशात हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाते. स्थानिक भाषेसोबतच हिंदीचाही पुरस्कार केला तर ते अधिक उपयुक्त होईल. उलट इतर भाषिक नागरिकांनी हिंदी शिकली तर त्याला रोजगारासाठी जास्त
संधी निर्माण होतील.

तामिळनाडूच्या युवकाला दिल्लीत काम करण्याचा अधिकार नाही का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री योगी म्हणाले, लखनऊ, भोपाळ अशा ठिकाणी तो काम का मिळवू शकत नाही. हिंदी भाषिक राज्यांमध्येही काम करण्याचा त्याला अधिकार आहे. हिंदी बरोबरच त्याला जेवढ्या जास्त भाषा येतील तेवढ्या त्याला जास्त संधी उपलब्ध होतील असे मतही त्यांनी व्यक्त केले.