मुलीने सांगितल्याने मनोज तिवारीने केले दुसरे लग्न

Manoj Tiwari

काही दिवसांपूर्वी मनोज तिवारीने (Manoj Tiwari) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलगी झाल्याची बातमी दिली होती. मनोजला एक मोठी मुलगी असून आता इतक्या वर्षानंतर त्याला मुलगी कशी झाली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अखेर मनोज तिवारीनेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर प्रथमच त्याने त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबतची माहितीही जाहीर केली आहे. भोजपुरी सिनेमाचा स्टार असलेला मनोज तिवारी राजकारणातही प्रचंड यशस्वी झाला असून भाजपकडून खासदार म्हणूनही तो संसदेत पोहचला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही मनोज तिवारीवरच सोपवण्यात आली होती. २००४ मध्ये मनोज तिवारीने ‘ससुरा बड़ा पैसावाला’ हा भोजपुरी सिनेमा केला. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्याने अनेक हिट सिनेमे दिले. सिनेमात येण्यापूर्वीच म्हणजे १९९९ मध्ये त्याने राणी तिवारीसोबत लग्न केले होते. त्यांना जिया नावाची एक मुलगीही आहे. मनोजने १३ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. त्याची मुलगी तिच्या आईबरोबर मुंबईतच राहाते. मनोज आता ५० वर्षांचा आहे. ३० डिसेंबरला मनोजने लहान बाळाचा फोटो टाकत बाप झाल्याची माहिती त्याने दिली.

तेव्हा सगळेच चकित झाले होते. मनोजने प्रथमच दुसऱ्या लग्नाबाबत माहिती देताना सांगितले, ‘मागे काय झाले त्याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही आणि मला त्याची आठवणही काढायची नाही. वेगळे होण्याचा निर्णय तिचा होता. माझी मुलगी तिच्या आईबरोबर राहाते. महिन्यात एक-दोनदा माझी आणि मुलीची भेट होते. माझ्या मुलीच्या आनंदातच मी आनंद मानतो. माझी मुलगी आणि माझी पूर्व पत्नी आनंदी राहो हीच माझी इच्छा आहे.’

मनोजने घटस्फोटानंतर आठ वर्षांनी गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये सुरभी तिवारीशी लग्न केले. सुरभी त्याची सेक्रेटरी होती आणि ती एक चांगली गायिकाही आहे. मनोजने सांगितले, माझ्या मुलीमुळे जियामुळे मी लग्न केले. जिया आणि सुरभी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे चांगले जमते. जियानेच मला सांगितले की, किती दिवस एकटे राहाणार, सुरभीशी लग्न करा. त्यामुळे मी लग्न केले, असे मनोजने यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER