नेस्लेच्या अहवालानुसार कंपनीचे बहुतेक खाद्यपदार्थ आरोग्यदायी नाहीत

Nestlé Products

नवी दिल्ली :- जगातील सर्वांत मोठी खाद्यपदार्थ कंपनी नेस्ले (Nestlé) सतत वादाच्या भोवऱ्यात असते. आता पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आहे. मात्र या वेळी स्वतः नेस्लेने कबूल केले आहे की, तिची बरीच उत्पादने आरोग्यासाठी पोषक नाहीत. कंपनीच्या अंतर्गत सादरीकरणाच्या वेळी नेस्लेने सांगितले आहे की, ६० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादने आरोग्याच्या निकषाला पूर्ण करू शकत नाहीत.

नेस्लेच्या अहवालानुसार कंपनीने मान्य केले की, नेस्लेच्या खाण्यापिण्यातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादने आरोग्यासाठी पोषक नाहीत. त्यामुळे या उत्पादनांना आणखी पोषक बनवण्याबाबत कार्य केले जात आहे. अंतर्गत अहवालात कंपनीने म्हटले आहे की, ६० टक्क्यांपेक्षा जास्त खाद्यपदार्थ आणि पेये आरोग्यासाठी लागू असलेले निकष पूर्ण करीत नाही.

जगातील सर्वांत मोठ्या खाद्य कंपनीनेही कबूल केले की, त्यांचे काही खाद्यपदार्थ कधीच आरोग्यदायी होणार नाहीत. ही उत्पादने अशी आहेत की, त्याच्यावर कितीही संशोधन केले तर ते आरोग्यासाठी पोषक ठरणार नाही. नेस्ले कंपनीने म्हटले आहे की, ‘कंपनी आपले पोषण व आरोग्य धोरण अद्ययावत करण्याचे काम करीत आहे. लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन आम्ही संपूर्ण पोर्टफोलिओ बदलण्याचा विचार करीत आहोत जेणेकरून लोकांना आवश्यक पोषण आणि संतुलित आहार मिळावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button