प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांना थंड जेवण देता येत नाही ; अधिकाऱ्याचं निलंबन

Shivraj Singh Chouhan

इंदूर : राज्याचा मुख्यमंत्री या पदाला विशेष सन्मान आहे. मुख्यमंत्री राज्याच्या कामासाठी एकदा घराबाहेर पडले की, त्यांचे सर्व कार्यक्रम शासनाच्या प्रोटोकॉलनुसार होत असतात. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या इंदूर (Indore)दौर्‍यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचे (Protocol)पालन करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तेथील एका अधिका-याला नोकरीतून निलंबित करण्या आले आहे. जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक मनीष स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान २३ सप्टेंबर रोजी इंदूर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या जेवणाची गुणवत्ता चांगली नसल्यानं एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मनीष स्वामी यांना निलंबित करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलमध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी ही कारवाई केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई मागे घेत पुन्हा मनीष स्वामी यांच्याकडे कार्यभार सोपवला.

मुख्यमंत्र्यांना इंदूर येथे पोहचण्यास दोन तास उशीर झाला. ते संध्याकाळी ६.१५ वाजता पोहोचणार होते परंतु त्यांना येण्यास रात्रीचे ८.१५ वाजले. रात्र आणि खराब हवामानामुळे त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी गाडीने भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला. एकामागोमाग एक कार्यक्रम सुरु असल्याने मुख्यमंत्र्यांना जेवणही करण्यास वेळ मिळाला नाही. म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जेवण पॅक करुन ते गाडीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

या प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. माजी मंत्री जीतू पटवारी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची खिल्ली उडविली, ते म्हणाले की, तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवता, तुमच्या राजवटीत बरेच लोक उपाशी झोपतात. त्यात थंड जेवण दिलं म्हणून तुम्ही एका अधिकाऱ्याला निलंबित केले, तुमची लाज वाटतेय अशा शब्दात त्यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER