चिपळुणातील पॅराकमांडो जवानाचा मध्यप्रदेशात अपघाती मृत्यू

Ratnagiri News

रत्नागिरी/प्रतिनिधी: चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द येथील पॅराकमांडो जवानाचा मध्यप्रदेशातील सागर या शहरातून कामावरून मित्रासमवेत घरी जाताना अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी घडली असून या जवानाचा मृतदेह मंगळवारी सकाळी मूळगावी आणला जाणार आहे. विशाल रघुनाथ कडव (३५) हे १३ वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते.

९ वर्षांच्या जम्मू काश्मीरमधील सेवेनंतर लष्करात त्यानी १३ वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात माजी सैनिक असलेले वडील, आई, पत्नी आणि ४ वर्षीय मुलगा आहे. विशाल हे कडव कुटुंबातील एकुलता मुलगा होते.