सिंधुदुर्गमध्ये क्वारंटाईन असणाऱ्या युवकाचा आकस्मिक मृत्यू

Death

रत्नागिरी : मालाडहून सावंतवाडी गुळदुवे येथे आलेल्या व क्वारंटाईन असलेल्या युवकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. मालाडहून भाड्याची गाडी करून हा युवक मंगळवारी गावी आला होता.

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला गुळदुवे येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच्या बरोबर त्याची पत्नी व मुलगा आली आहेत. रात्री अचानक मृत युवकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. नेताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.

या युवकाचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. मृत युवकाचा स्वॅब नमुना घेतला असून त्याचा रिपोर्ट आल्यावर मृत्यूूूचेे कारण स्पष्ट होणार आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या युवकाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्रही बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ठाकूर यांना तशा सूचना दिल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER