एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात; सर्व सुरक्षित

Eknath Khadse Car Accident

जळगाव :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या गाडीला अंमळनेरहून जळगावकडे (Jalgaon) येताना धरणगावजवळ अपघात झाला. स्वतः खडसे यांनी आपल्या ट्विटरवरून ही दिली. खडसे यांनी लिहिले – आज अंमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावजवळ माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला.

गाडीचा वेग कमी असल्याने व चालकाच्या प्रसंगावधाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही. खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेची उमेदवारी व मंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टीव्हीच्या एका वृत्तवाहिनीच्या बातमीत म्हटले आहे की, खडसे यांच्या गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER