मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर चार गाडयांचा भीषण अपघात; तिघे ठार

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मुंबईच्या दिशेने येणा-या लेनमध्ये खालापूरजवळ चार गाडयांचा आज ( मंगळवारी ) सकाळी भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ट्रक, बस, आणि दोन ट्रेलर यांची एकमेकांना भीषण धडक बसून ही दुर्घटना घडली आहे.

या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस वे वरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.