सोलापूर-हैदराबाद मार्गावर भीषण अपघात; पाच ठार

Accident

उस्मानाबाद : उमरग्याजवळील येनेगूर गावाजवळ आज (शुक्रवार) सकाळी दोन बसची समोरासमोर धडक झाली. उमरगा तालुक्याच्या डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती, तर कर्नाटकची बस उमरग्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही बसचे चालक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही प्रवाशांची प्रकुर्ती चिंताजनक आहे. या भीषण अपघातामुळं मुंबई-हैदराबाद महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती.