कमल हसन यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात : ३ ठार, १० जखमी

Accident during shooting of Kamal Haasan film

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘इंडियन-२’ ह्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. क्रेन कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दिग्दर्शक शंकर, पर्सनल दिग्दर्शक मधु (२९ वर्षे), सहायक दिग्दर्शक कृष्णा (३४ वर्षे) आणि एक कर्मचारी चंद्रन (६० वर्षे) यांचा समावेश आहे.

या अपघातावेळी अभिनेता कमल हसन सेटवरच उपस्थित होते. ते सुखरूप असून त्यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. ‘इंडियन- २’ या चित्रपटाचे शूटिंग चेन्नईजवळ ईव्हीपी एस्टेट स्पॉटवर सुरू होते. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तामिळनाडूत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १९ जणांचा मृत्यू