हिंगणा रोड येथे अपघात, १ ठार

नागपूर :- हिंगणा रोड महाजन वाडी येथे झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. योगेश शंकर सोनवणे वय २४ वर्ष रा. अमरनगर असे मृतकाचे नाव आहे.

योगेश व त्याचा मित्र असे दोन जण १७ डिसेंबर रोजी रात्री हिंगणा येथून मोटरसायकलने घरी परत जात होते. वाटेत महाजन वाडी बस स्टाप समोर अज्ञात वाहन आडवे आल्याने, दोघेही गाडीवरून खाली पडून जखमी झाले. योगेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्या मित्रावर उपचार सुरु आहे.

(विनायक पुंड )