चंद्रपुरात अपघात : देवदर्शनाहून येणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू

chandrapur accident

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यात भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. माहितीनुसार, मूल तालुक्यातील केसलाघाट येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील स्कॉर्पिओने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना प्रथमिक उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. या अपघातात मृत्यू झालेल्यात तीन महिला, दोन पुरुष आणि एका दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये चालकांसह पाच महिलांचा समावेश आहे.

तामिळनाडूत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १९ जणांचा मृत्यू