‘चूक शोधा’ राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नेत्याचे पक्षाला खडेबोल

Tariq Anwar

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020 ) एनडीएने (NDA) स्पष्टपणे बहुमत मिळवले आहे. यापार्श्वभूमीवर आता काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपण हरलोय हे स्वीकारलं पाहिजे, असे म्हणत काँग्रेसचे (Congress) नेते तारीक अन्वर (Tariq Anwar) यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आरजेडी महागठबंधनला अपेक्षित यश गाठता आले नाही. एकट्या तेजस्वी यादव यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. पण, काँग्रेसला फक्त 19 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या तारीक अन्वर यांनी ट्वीट करून काँग्रेस पक्षाला खडेबोल सुनावले आहे.

अन्वर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , आपल्याला सत्य हे स्वीकारले पाहिजे. काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करता आले नाही. काँग्रेस पक्षाला याबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्लावजा टोलाच तारीक अन्वर यांनी पक्षाला लगावला आहे.

आपण बिहार निवडणुकीत नेमकं कुठल्या कारणाने हरलो याचा विचार केला पाहिजे, आपली नेमकी चूक कुठे झाली आहे, याचा शोध घेतला पाहिजे. MIM पक्षाने बिहारच्या राजकारणात एंट्री केली हे चांगले लक्षण नाही, असंही तारीक अन्वर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER