देशभरात लसीकरणाचा वेग वाढवा, ५ मुद्द्यावरून मोदींना सल्ला; मनमोहन सिंग यांचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पाठोपाठ आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाविरुद्धची (Corona) लढाई गतीमान करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी पत्रातून केली आहे.

या पत्रातून मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांचे कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या देशातील समस्यांकडेही लक्ष वेधले आहे. मनमोहन सिंग यांनी ५ मुद्द्यांवरून मोदींना सल्लाही दिला आहे. आम्ही किती लसीकरण केले हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचे लसीकरण केले याकडे लक्ष दिले पाहिजे. भारतासहीत संपूर्ण जग गेल्या १ वर्षापासून कोरोना महामारीचा सामना करत आहे. अनेक आई-वडिलांनी वर्षभरापासून आपल्या मुलांना पाहिलेले नाही. आजी-आजोबांनी आपल्या नातवांना पाहिले नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाहिलेले नाही. अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. महामारीने लाखो लोकांना गरीबीच्या खाईत ढकलले आहेत. पुन्हा कोरोनाची लाट आल्याने लोक भयभीत झाले आहेत. जनजीवन केव्हा सुरळीत होईल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र, लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने वाढवणे, हे अत्यंत महत्वाचे आहे. माझ्या सूचना तुम्ही अंमलात आणाल याची अपेक्षा आहे, असे मनमोहन सिंग यांनी या पत्रात नमूद केले आहे.

“पुढच्या ६ महिन्यांसाठी लसींची ऑर्डर दिली आहे. या लसींचे राज्यांना वितरण कसे होणार? याबाबतची माहिती दिली पाहिजे. जर वेळेत लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करायचे असेल, तर पुरेशी मागणी केली पाहिजे. त्यामुळे लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही त्यावेळेत उत्पादन करणे शक्य होईल.” असे सिंग यांनी म्हटले आहे.

४५ वर्षाखालील वयोगटांना लस द्या
फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीची परिभाषा ठरवण्यासाठी राज्यांना अधिकार देण्यात यावे. तसेच ४५ वर्षाखालील लोकांनाही लस देण्यास परवानगी द्यावी. भारतातील वॅक्सीन निर्मात्यांना सवलती दिल्या पाहिजे. इस्रायलच्या धर्तीवर अनिवार्य लायसेंसिंगची तरतूद केली पाहिजे, असेही सिंग यांनी सांगितले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button