चित्रा वाघ यांच्या पतीवर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल

ACB Files case against Chitra Wagh husband Kishoe Wagh

मुंबई :- पुजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांत आधी पुढे आलेल्या आणि शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करणा-या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती अडचणीत सापडले आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी किशोर वाघ (Kishor Wagh) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

12 फेब्रुवारी रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने किशोर वाघ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला. एकीकडे पूजा चव्हाण प्रकरणात चित्र वाघ या आक्रमक झाल्या असताना आणि वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली असताना आता ऐनवेळी त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली आहे. आता त्यांच्याच पतीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे भाजपची सत्ता असतानाचं हे प्रकरण आहे. या प्रकरणानंतर वाघ यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेशही केला त्याचवेळी त्यांच्या पक्ष बदलावर अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते. आता शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण अजूनच चिघळण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी पण वाचा : अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे? चित्रा वाघ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER