गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला अभाविपने काढली ३०० फूट तिरंगा रॅली

Satara

सातारा : गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सीएए व एनआरसी समर्थनार्थ सातारा शहरात ३०० फूट लांबीचा तिरंगा हाती घेत विशाल रॅली काढली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी रॅली मार्ग दणाणून गेला. रॅलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तर ३०० फूट तिरंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी)च्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये ३०० मीटर लांबीचा तिरंगा हाती घेण्यात आला होता. सीएए या कायद्याविषयीचा गैरसमज दूर व्हावा, या कायद्याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतील ३०० फुटी झेंड्याने सातारकरांची लक्ष वेधून घेतले. तर भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी आदी घोषणा देण्यात आल्या.