प्रियंका गांधींशी गैरवर्तन : संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडून टीकेची झोड

Jitendra Awhad-Priyanka Gandhi-Sanjay raut

मुंबई : उत्तर प्रदेश पोलिसांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) निघाल्या होत्या. यावेळी यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींनी गैरवर्तन केल्याचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सर्वच स्तरावरून टीकेची झोड उठवली जात आहे.

योगीजींच्या राजवटीत कोणतीही महिला पोलिस नाहीत का? असाप्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीका केली आहे.

 

याच फोटोवरून राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही टीकेची झोड उठवली आहे. त्यांना भीती वाटते, त्यांना भीती आहे श्रीमंतांची, पोलीस दल, शस्त्र आणि दारुगोळ्याची. एक दिवस निशस्त्र आणि गरीब लोक त्यांच्याबद्दल भीती बाळगणार नाही. ह्याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

 

ही बातमी पण वाचा : ‘राम’ राज्यातील हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही! – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER