बाबरीबाबतच्या ‘त्या’ विधानामुळे उद्धव ठाकरेंवर भडकले अबू आझमी

Abu-Azmi-And-Uddhav-Thackeray

मुंबई : विधानसभेतील भाजपावर(BJP) टीका करताना बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले होते की, बाबरी पाडताना येरे-गबाळे पळून गेले आणि बाळासाहेब ठाम राहिले होते हे लक्षात असू द्या. माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते.

या विधानामुळे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी (Abu Azmi) उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आता केवळ एका पक्षाचे प्रमुख नसून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कालच्या भाषणात ते जे काही बोलले ते चूक आहे. एका अपराधासाठी ते स्वतःला श्रेय घेत आहेत! यासाठी मंत्रिमंडळातल्या मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अबू आझमी महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहेत. ते मंत्र्यांचा राजीनामा मागत असतील तर आघाडीत नेमक चालले आहे, हा प्रश्न निर्माण होतो. दररोज कॉमन मिनीमम प्रोग्रॅमवरून त्यांच्यात वाद होतात. याच कारणामुळे अबू आजमी राजीनामा मागत असावेत, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER