मेट्रो चाचणी कार्यक्रमात अनिल परब यांची अनुपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

Anil Parab - Maharashtra Today

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७च्या चाचणीला ३१ मे पासून सुरुवात झाली. पण आघाडी सरकारच्या या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब गैरहजर असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब (Anil Parab) यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव असताना ते गैरहजर होते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनिल परब यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असून त्यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. MMRDA आजपासून डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनपर्यंत चाचणी झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच्या टर्मिनल १ आणि टर्मिनल २ ला पोहोचण्यासाठी MMRDAकडून भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. २४ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : अनिल परब चौकशीच्या फेऱ्यात, गृहमंत्री वळसे पाटलांचे मोठे विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button