12 वर्षा पासुन फरार असलेल्या आरोपीला अटक

Arrested

ठाणे :- गरजू लोकांना बाहेर देशात नोकरी लावण्याचे काम करणाऱ्या शैलेंद्र सिंह दानसिंह शेखावत वय 27 वर्ष याचा डोंबिवली विष्णूनगर येथे बारा वर्षापूर्वी खुन झाला होता, तो लोकांना बाहेर देशात पाठवायचा व त्या बद्दल त्यांच्या कडुन पैसे घ्यायचा, त्याचा खुन करायच मुख्य कारण होत त्याने आरोपी नरेंद्रसिंग राजबरसिंग राजावत व पिंटुसिंग बिट्टूसिंग राजावत हे दोघे राहणार डोंबिवली मुळगाव मेहंदवा तालुका रौन जिल्हा भिंड मध्यप्रदेश यांच्या कडुन बाहेर देशात नोकरी लावतो म्हणुन पैसे घेतले होते, परंतु त्यांना त्याने नोकरी लावली नव्हती आणी पैसे ही परत केले नव्हते या कारणावरून आरोपी नरेंद्र सिंग राजावत, पिंटुसिंग राजावत, राजकुमार राजावत, रिषी डेग यांनी आपापसात संगनमत करून शैलेंद्रसिंह शेखावत याचा गळा आवळून त्याला ठार मारून त्यास शाली मध्ये गुंडाळून नाल्यात फेकुन दिले होते व पळुन गेले होते, त्या नंतर पुरावा नष्ट केल्या बाबत त्यांच्या वर दिनांक 21/03/2007 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही बातमी पण वाचा : पुण्यात तरुणावर ॲसिड हल्ला, हल्लेखोराची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

ह्या गुन्ह्यातील आरोपी हे खुन केलेल्या दिवसांपासून फरार होते, आरोपींविरोधात कलम 299 प्रमाणे 13/05/2008 रोजी पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते, आरोपी मिळुन येत नसल्या मुळे न्यायालयाने 2/2/2019 रोजी आरोपींविरुध्द कलम 87 प्रमाणे जाहीरनामा काढलेला होता, त्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, त्या प्रामाणे गुन्हे शाखा यूनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तपासास सुरुवात केली, त्या मध्ये मिळालेल्या गोपनीय माहीती वरून गुन्ह्यातील फरार आरोपी राजकुमार बहादूरसिंग राजावत हा त्याच्या मुळ गावी भिंड मध्यप्रदेश येथे असल्याचे समजले, त्या प्रमाणे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली नितीन ठाकरे व त्यांचे पथक भिंड मध्यप्रदेश येथे रवाने झाले, भिंड मध्यप्रदेश हा सम्पूर्ण परिसर चंबळ खोऱ्याच्या बाजूला असुन तो प्रदेश गुन्हेगारी साठी बदनाम आहे, त्यामुळे स्थानीक पोलीस स्टेशन असवाल, भिंड, मध्य प्रदेश यांच्या मदतीने 15 दिवस तिथे मुक्काम करून आरोपी राजकुमार राजावत वय 62 वर्ष याला शिताफीने ताब्यात घेतले. या मध्ये पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांनी मोलाची कामगीरी केली.