भारतातील सुमारे 400 दशलक्ष कामगारांवर गरीबी, बेरोजगारी ओढवण्याची शक्यता : यूएनचा अहवाल

नवी दिल्ली :- कोरोना विषाणुमुळे संपूर्ण जग आर्थिक खाईत लोटले गेले आहे. या एका विषाणुने संपूर्ण मानवजातीवर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता युनायटेड स्टेटचा अत्यंत धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. यू एनच्या अहवालानुसार भारतातील सुमारे 400 दशलक्ष कामगारांवर गरीबी, बेरोजगारी ओढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) ‘आयएलओ मॉनिटरच्या दुस-या कोविड -19 आणि वर्क ऑफ वर्ल्ड’ या नावाच्या अहवालात कोरोनाव्हायरस (साथीच्या रोगाचा) ” दुस-या द्विश्वयुद्धापेक्षाही सर्वात वाईट जागतिक संकट” म्हणून वर्णन केले आहे.

जगभरात दोन अब्ज लोक हे खाजगी, क्षेत्रात काम करतात (मुख्यत: उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये) याचे प्रमाण अधिक आहे आणि आता सर्वात मोठा धोकाही याच क्षेत्रातील कामगारांना आहे, तसेच, या अहवालात म्हटल्याप्रमाणे, कोरोनाचे संकट कोट्यवधी खाजगी, क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांवर गंभीर परिणाम करणार आहे.

यू एन च्या ्हवालानुसार जगभरात आर्थिक मंदी येण्याची शक्यता असून याचा सर्वात मोठा फटका अस्थायी स्वरूपात काम करणा-या खाजगी कर्मचा-यांना अधिक बसणार आहे. यूएनच्या अहवालातून 400 मिलियन कामगार बेरोजगार होण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.