देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के तबलिगी !

Lav Aggarwal

दिल्ली : निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या मरकजला हजर राहिलेल्या लोकांनी देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना पसरवल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही आकडेवारी जाहीर केली. देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के तबलिगी जमातशी संबंधित आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात सध्या कोरोनाचे २९०२ रुग्ण असून त्यापैकी १०२३ तबलिगी आहेत.

तबलिगींमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली, १४ राज्यांत जमातचे ६४७ कोरोना रुग्ण आढळलेत.

शनिवारी तबलीगशी संबंधित १७ नवे रुग्ण आढळले असून यांची संख्या १०२३ झाली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली.

देशात सध्या कोरोनाचे २९०२ रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णांचा आकडा अचानक वाढला असून ६०१ नवीन रुग्ण आढळले आहेत. १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ६८ झाला आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. १८३ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. तबलीग जमातच्या संपर्कात आलेल्या २२ हजार लोकांना विलगीकरणात ठेवले आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.