कोल्हापूर शहरातील ४०० कुटुंबासह सुमारे २५ हजार जण थांबले

Migrant Workers

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे जगाबरोबर कोल्हापूरच्या उद्योगाची चक्रेही थांबली. दीड महिन्यानंतर श्रमिक रेल्वेने गावी जाण्याची व्यवस्था झाली. याच दरम्यान काही व्यापार आणि उद्योगही सुरू झाला. पहिल्यापासून जाण्यासाठी धडपडणारे सुमारे ३० हजार परप्रांतिय आपल्या गावी गेले. तर दुसऱ्या बाजूला जगात भारी कोल्हापुूरी याप्रमाणे शहरातील सुमारे ४०० परप्रांतिय कुटुंबे आणि सुमारे २५ हजारांहून परप्रांतियांनी काहीही हेऊदे येथेच थांबायचे या निर्धार करत पुन्हा आपला मुळ उद्योगधंदा सुरू केला आहे.

जेसीबी, डंपर, बुलडोझर, स्टोन क्रेशर, सेट्रींग, खोदकाम, फरशी फिटींग, फौंड्री उद्योग आदी क्षेत्रातील सुमारे ३० हजारहून अधिक बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी राज्यातील परप्रांतिय कामगार आपल्या गावी निघून गेले. रखडलेले गृहप्रकल्प, स्टोन क्रेशरची बंद झालेली धडधड, ठप्प झालेल्या वाहन उद्योगामुळे मंदावलेला फौंड्री उद्योग, पुणे आणि मुंबई बाजारपेठेवर अवलंबून असलेली व्यवसायाची बंद झालेली धडधड आदीमुळे या उद्योगात असलेले परप्रांतिय बसूनच होते. यातच लॉकडाऊ शिथीलीकरण आणि मोफत ट्रेनची सोय झाल्याने अनेकांची पावले गावाकडे वळली.

गेल्या दीड महिन्यातील विपरीत काळातही कोणत्याही स्थितीत कोल्हपूर सोडायचे नाही, असे ठरवून सुमारे २५ हजारपेक्षा अधिक परप्रांतिय येथेच थांबले होते. यातील अनेक कामगारांची दुसरी पिढी येथे आहे. स्थानिकांच्या मदत मिळत होती. दरम्यान, लॉकडाउनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्या शहारतील दुकानांसह व्यापार उद्योग सुरू झाला. यामुळे उन्हाळी सुट्टीत गावाकडे जाणाऱ्यांनीही बेत रद्द केला.

शहरातील लहान मोठे उद्योग आणि व्यवसाय सुरू झाल्याने शहरात छोटे व्यापार करणारे, दुकानात कामास असणाऱ्या सुमारे ४०० परप्रांतिय कुटुंबांनी घरी जाण्याचा निर्णय बदलला. गावी जाऊनही काहीही उद्योग मिळणार नाही, हे माहीती असूनही हे लोक जाण्याच्या मानसिकतेत होते. मात्र, आता व्यवहार सुरळीत होत असल्याने बहूतांश लोक थांबले आहेत, असे

कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रिजचेसंजय शेटे यांनी सांगितले.सोने आणि चांदी उद्योगात सुमारे तीन हजार परप्रांतीय कामगार आहेत. लहान मोठे २०० कारखान्यात ते काम करतात. दर उन्हाळी सुट्टीत यातील कारागिर घरी जातात. व्यवसाय सुरू झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाह सुरू आहे. हे कारागिर कोल्हापुरातच असल्याचे बंगाली कारागिर असोसिएशनचे बिश्वजीत प्रामाणिक यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER