पहिल्याच दिवशी सुमारे 18 हजार 338 कर्मचाऱ्यांना लस

Corona Vaccine

मुंबई : राज्यात काल शनिवारपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सुमारे 18 हजार 338 कर्मचाऱ्यांना (18,338 employees) लस देण्यात आली. पुण्यात सर्वाधिक 1795, तर सिंधुदुर्गमध्ये केवळ 165 जणांना लस दिली गेली.

राज्यातील 285 केंद्रांवर 28 हजार 500 कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, पहिला दिवस असल्यामुळे सकाळी साडेअकरा वाजता मोहिमेला सुरुवात झाली. त्यामुळे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. सायंकाळी 7 नंतरही मोहीम सुरूच होती. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीत भर पडलेली दिसेल. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा राज्यस्तरीय प्रारंभ झाला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे, तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे प्रारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा प्रारंभ झाला. दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER