भारतीय स्त्रीला ‘सबला’ बनवणाऱ्या ‘अबला बोस’, यांच्यामुळं स्त्रीयांना मिळाला मतदानाचा अधिकार!

Abla Bose

भारतात १९व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रीय स्वातंत्र आंदोलन रुप घेत होतं. अनेक सामाजिक आणि आर्थिक बदलांसाठी भारतीय समाज मन तयार होत होतं. त्यावेळी भारतीत समाजात सती प्रथा, विधवांवरील बहिष्कार, बाल विवाहा सारख्या कुप्रथा होत्या. यांना रोखण्यासाठी बंगालच्या प्रख्यात कवयित्री शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कामिनी राय यांनी उल्लेखनीय भूमिका निभावली. त्यांना प्रेरणा मिळाही होती अबला बोस यांची. ज्यांनी महिलांची परिस्थीती सुधारण्यासाठी भरीव कामगिरी केली होती.

कोण होत्या अबला बोस

अबला यांचा जन्म ८ ऑगस्ट १८६५ला बरिसलमध्ये झाला. त्यांचे वडील दुर्गामोहन दास ब्रम्ह समाजाचे मोठे नेते होते. त्यांची आई ब्रम्हमयी, विध्वांच्या विकासासाठी काम करत होत्या. अबला दहा वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. अबलावर त्यांच्या आईचा दांडगा प्रभाव होता. सुरुवातीपासूनच महिला सक्षमीकरणाचं बालकडू त्यांना घरातूनच मिळालं. शालेय शिक्षण पुर्ण करुन त्यांनी बेथ्यून महाविद्यायलात प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी मेडिसीनचा अभ्यास मद्रास विद्यापीठातून पुर्ण केला.

शेवटच्या वर्षाला असताना तब्येत बिघडल्यामुळं त्या घरी परतल्या. २३ व्या वर्षी त्यांच लग्न जगदिशचंद्र बोस यांच्याशी झालं. रेडिओ विज्ञानाचे पितामह म्हणून जगदिशचंद्र बोसांची जगभरात ओळख होती. १९१६ला त्यांना नाइटहूड या उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. यानंतर त्या लेडी बोस या नावाने ओळखल्या जावू लागल्या. लेडी बोस यांच्या कर्तूत्वासाठी त्यांचे पति प्रेरणास्त्रोत असल्याच मानले जाते.

शैक्षणिक सुधारणा

संशोधनासाठी जगदिशचंद्र बोसांना अनेकदा विदेश वाऱ्या कराव्या लागत. यावेळी अबला त्यांच्या सोबत असायच्या. त्यांनी विदेशात महिलांचे सक्षिमीकरण जवळून बघितलं. भारतातही अशा सुधारणा व्हाव्यात ही इच्छ्या त्यांच्या मनात बल घेवू लागली.

युरोपातून भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय नारीला सक्षम बनवण्याची मोहिम हाती घेतली. १९१०ला त्या ब्रम्हो बालिका विद्यालयाच्या सचिव बनल्या. पुढं २६वर्ष त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. इतकेच नव्हे तर त्यांनी मोंटेसरी स्कूल सिस्टमचाही विकास केला. ब्रम्ह गर्ल स्कूलची त्यांनी सुरुवात केली. याच वर्षी त्यांनी जगदिशचंद्र बोस आणि चित्तरंजन दास यांच्या सहकार्याने नारी शिक्षा समितीची स्थापना केली. यात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता आणि विद्यासागर यांचे सहकार्य त्यांना मिळालेय त्यांच्या या प्रयत्नामुळंच भारतात स्त्री शिक्षणाच्या चळवळीला दिशा मिळाली.

अबला यांनी त्यांच्या संपूर्ण जीवन काळात ८८ प्राथमिक शाळा, १४ प्रोढ वर्ग केंद्रे सुरु केली. यात मुरलीधर गर्ल्स कॉलेज आणि बेल्टोला गर्ल्स स्कूल अशा प्रतिष्ठित संस्थाही समाविष्ट आहेत.

जगदिशचंद्र बोस आणि अबला बोस या दांपत्याचे स्वामी विवेकानंदांसोबत घनिष्ठ संबंध होते. १९२५ला त्यांनी विधवांना शिक्षण देण्याचे काम हाती घेतले. विधवांना शिक्षण तर दिलेच पण त्यातून काही शिक्षिकाही घडवल्या ज्यांनी नंतरच्या काळात विद्यादानाच काम केलं. त्यांना नारी शिक्षण समितीच्यावतीनं नोकरी ही दिली.

लेडी बोस यांनी कोलकता आणि झारग्राम या ठिकाणी शिल्प आणि कला विषयक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. महिलांना स्वयंरोजगाराशी जोडण्याच काम त्यांनी केलं. या सोबतच गरिब महिलांना कापड शिलाई, चमड्याची कारागरी आणि मातीची भांडी बनवण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले.

महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची पावती म्हणून त्यांना बंगाल महिला कॉंग्रेसच अध्यक्ष करण्यात आलं.

महिलांना मताधिकार मिळवून देण्यासाठी निर्णय भूमिका

भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यात त्यांची निर्णायक भूमिका होती. सरोजिनी नायडू, मार्गरेट कजिन्स, जोरोथी जिनराजदासा, रमाबाई रानडे यांच्या सोबत मिळून त्यांनी प्रतिनिधिमंडळाचा त्या हिस्सा होत्या जे मंडळ १९१७ला एडविन मोंटेग्यू यांना भेटलं होतं. टेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणांवर त्यावेळी चर्चा होत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER