आबिद अलीच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन्ही शतकी भागीदारी आहेत खास!

Maharashtra Today

पाकिस्तानचा (Pakistan) सलामी फलंदाज आबिद अली (Abid Ali) याने झिम्बाब्वेविरुद्धच्या हरारे कसोटीत (Harare Test) नाबाद २१५ धावांची मोठी खेळी केली आणि या खेळीदरम्यान एक असा विक्रम केला जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुणालाही जमला नव्हता. या डावात त्याने दोन मोठ्या भागीदारी (Partnership) केल्या दीडशेपेक्षा अधिक धावांच्या! पहिली भागीदारी २३६ धावांची दुसऱ्या गड्यासाठी आणि दुसरी भागीदारी १६९ धावांची आठव्या गड्यासाठी. मध्ये पाच गडी बाद झालेले. या प्रकारे एका कसोटी डावात दीडशेपेक्षा अधिक धावांच्या दोन भागीदारी पण त्यामध्ये चार किंवा अधिक विकेटचे अंतर असा तो पहिलाच फलंदाज ठरला.

लागोपाठ विकेटसाठी किंवा एक-दोन गड्यांच्या अंतरात दोन शतकी भागीदाऱ्या करणारे बरेच फलंदाज आहेत; पण दोन भागीदारींदरम्यान पाच विकेटचे अंतर राखणारा आबीद अली एकमेव आहे. दुसऱ्या गड्यासाठीच्या २३६ धावांच्या भागीदारीत त्याचा साथीदार अझहर अली होता, ज्याने १२६ धावा केल्या आणि आठव्या गड्यासाठीच्या भागीदारीत त्याचा साथीदार होता नौमान अली ज्याने ९७ धावा केल्या. योगायोगाने दोन्ही भागीदारीतील आबीद अलीचे साथीदार फलंदाजही अली याच आडनावाचे होते. विशेष म्हणजे पाकिस्तानने या सामन्यात जो संघ उतरवला आहे त्यात चार खेळाडू – आबीद, अझहर, नौमान आणि हसन- हे अली आडनावाचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button