अभिषेक म्हणतो, वडिल अमिताभ यांनी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली

abhishek bachchan - amitabh bachchan - Maharastra Today
abhishek bachchan - amitabh bachchan - Maharastra Today

सुपरस्टार माता-पित्याचे अपत्य असले आणि माता-पिता ज्या फील्डमध्ये आहेत त्याच फील्डमध्ये मुलांनी प्रवेश केला की त्यांची माता-पित्यांशी तुलना होतेच. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) माता-पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री तर झोकात केली. पण त्यांच्याप्रमाणे त्याला अजूनही यश मिळालेले नाही. अभिषेक अजूनही संघर्षच करतोय. अभिषेक म्हणतो, माझे सिनेमे फ्लॉप होत असल्याने मी तर बॉलिवूड सोडणार होतो पण वडिलांनी मला संघर्ष करण्याची प्रेरणा दिली म्हणून मी आजही काम करतोय असे सांगितले.

अभिषेक बच्चन अभिनीत आणि अजय देवगण (Ajay Devgan) निर्मित शेअर दलाल हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित ‘बिग बुल’ हा त्याचा सिनेमा नुकताच ओटीटीवर रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचाही म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. पण मुलाचा सिनेमा असल्याने पिता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचा प्रचार करण्यास सुरुवात केली असून अभिषेकच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसाही केली आहे. यासाठी अमिताभ बच्चन यांनी एक भला मोठा ब्लॉगही लिहिला असून अभिषेकचा गौरव केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर बिग बुलबाबत लिहिले आहे, एखाद्या पित्याला त्याचा मुलगा यशस्वी होणे हे पाहणे खूपच चांगले आणि अभिमानास्पद वाटते. अभिषेकने या सिनेमात चांगले काम केले आहे. त्याचा मला अभिमान वाटतो. मी इतर कोणत्याही वडिलांपेक्षा वेगळा नाही. एवढेच नव्हे तर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर तीन वेळा बिग बुल सिनेमा पाहिला असून आज रात्री पुन्हा पाहाणार असल्याचेही म्हटले आहे.

अभिषेकने २००० मध्ये जे. पी. दत्तांच्या ‘रिफ्यूजी’ सिनेमाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. हा सिनेमा बऱ्यापैकी बॉक्स ऑफिसवर चालला होता. त्यानंतर काही सिनेमे अभिषेकने केले आणि ते सुपरफ्लॉप ठरले होते. पत्रकारांशी बोलताना अभिषेकला त्याच्या अयशस्वी सिनेमाबाबत विचारले असता त्याने सांगितले, मी खूप चांगले काम करीत होतो पण माझे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते. ओळीने काही सिनेमे फ्लॉप झाले होते. त्यावेळी आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता. पण मीडियामध्ये माझ्याबाबत जे काही छापले जात होते ते चांगले नव्हते. अनेक जण मला शिव्या द्यायचे आणि मला अभिनय येत नाही असेही म्हणत असत. त्यामुळे मी खूप निराश झालो होतो.

मी वडिलांकडे अमिताभ बच्चन यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी योग्य नाही. मला काहीतरी दुसरे करावे लागणार आहे. पण ते माझे सगळ्यात मोठे समर्थक आहेत. त्यांनी, बॉ़लिवूडमध्ये असे होतच असते. तू तुझे काम करीत राहा. रोज सकाळी उठल्यानंतर नव्या दिवसाचा संघर्ष तुला करायचा असून तुला स्वतःला तुझी जागा निर्माण करावी लागेल. प्रत्येक सिनेमानंतर तू अनुभवी होशील आणि तुझे काम सुधारेल. तू भूमिकांची लांबी बघू नकोस तर ज्या भूमिका मिळतील त्या कर. तुला यश मिळेल माझ्या शब्दांवर विश्वास ठेव असा सल्ला मला दिला. त्यांच्या शब्दांनी मला धीर मिळाला आणि् त्यांचा सल्ला मानून संघर्ष सुरु ठेवला. आजही माझा संघर्ष सुरु आहे असेही अभिषेक म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button