अभिषेकने पूर्ण केले ‘बॉब बिस्वास’चे शूटिंग

Abhishek Bachchan - Bob Biswas

अभिषेक बच्चनही (Abhishek Bachchan) आता अक्षयकुमारच्या (Akshay Kumar) पावलावर पाऊल टाकतोय की काय असे वाटू लागले आहे. अभिषेक बच्चन त्याच्या चित्रपटांचे लवकरात लवकर शूटिंग पूर्ण करून नव्या सिनेमाच्या तयारीला लागण्याच्या मार्गावर आहे. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अभिषेकने अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) लुडोचे शूटिंग आणि डबिंग पूर्ण केले होते. मात्र हा सिनेमा मोठ्या पडद्याऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. लॉकडाऊननंतर शूटिंग सुरु झाल्यानंतर अभिषेकने ‘बॉब बिस्वास’ (Bob Biswas) चे शूटिंग पूर्ण केले आहे. नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर अभिषेक त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. केवळ 43 दिवसात अभिषेक बच्चनने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अक्षयकुमारही 40 ते 45 दिवसात त्याचा एक चित्रपट पूर्ण करतो.

गेल्या दोन वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या शाहरुखने अभिनय करण्याऐवजी या दोन वर्षात सिनेमाच्या निर्मितीवर भर दिला होता. लॉकडाऊनच्या अगोदर त्याने त्याच्या रेड चिली बॅनरअंतर्गत अभिषेक बच्चनला घेऊन ‘बॉब बिस्वास’ सिनेमाची घोषणा केली होती. विद्या बालन अभिनीत ‘कहानी’ सिनेमातील काँट्रॅक्ट किलर बॉब विस्वास हे पात्र शाहरुख मुख्य पात्र म्हणून पडद्यावर ‘बॉब बिस्वास’च्या नावानेच घेऊन येत आहे. आणि या काँट्रेॅक्ट किलरची भूमिका अभिषेक बच्चन साकारीत आहे. अभिषेक बच्चनला लुकही ‘कहानी’मधील ‘बॉब बिस्वास’चाच दिलेला आहे.

सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे. अभिषेकच्या या सिनेमाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक सुजय घोष यांची मुलगी अन्नपूर्णा घोषने केले आहे. अन्नपूर्णाचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमाचे जास्तीत जास्त शूटिंग कोलकाता येथेच करण्यात आले आहे. सिनेमात अभिषेकसोबत चित्रांगदा सिंह दिसणार आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने सोशल मीडिया अकाउंटवर ‘बॉब बिस्वास’चे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. यासोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अभिषेक बच्चन, अन्नपूर्णा घोष आणि सुजय घोष दिसत आहेत. फोटोसोबत, ‘एक अत्यंत खास असा सिनेमा अखेर पूर्ण झाला आहे. ‘बॉब बिस्वास’ लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे असे लिहिले आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शाहरुख खानने चित्रपटाशी संबंधित सगळ्यांचेच आभार मानले. सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम पुढील वर्षी सुरु केले जाणार असून 2021 च्या मध्यावर हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER