अभिषेक बच्चन ‘दसवी’त दिसणार

Abhishek bacchan

अभिषेक बच्चननची लॉकडाऊनमधली इनिंग चांगलीच यशस्वी होत असताना दिसत आहे. अभिषेकची ब्रेथ वेबसीरीज बऱ्यापैकी हिट झाली असून आता तो लुडो चित्रपटात दिसणार असून हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अजय देवगनच्या ‘द बिग बुल’मध्ये दिसणार असून शाहरुख खानच्या ‘बॉब विस्वास’चेही शूटिंग लवकर सुरु करणार आहे. याच दरम्यान अभिषेकला ‘दसवीं’ नावाचा चित्रपटही निर्माता दिनेश विजनने ऑफर केला. कथा ऐकताच अभिषेकने लगेचच चित्रपटात काम करण्यास होकार दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा असून अभिषेक बच्चन यात एका भ्रष्ट नेत्याची भूमिका साकारणार आहे. हा नेता अशिक्षित असून अत्यंत लालची आणि भ्रष्ट असतो. जो पुढे जाऊन मुख्यमंत्रीही बनतो. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्याला तुरुंगात जावे लागते. तुरुंगात तो अभ्यास करतो आणि दहावीची परीक्षाही पास होतो. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिषेक शिक्षणाचे महत्व समजावून सांगणार आहे. चित्रपटात यामी गौतम जेलरच्या भूमिकेत दिसणार असून सोबत निमरत कौरही असून ती अभिषेक बच्चनच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER