अभिनेता अभिषेक बच्चनही कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

Abhishek Bachchan

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी कोरोनावर (Corona) मात केली असून आज त्यांना रु्गणालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

“एक वचन हे एक वचनच असतं. आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार”, असे ट्विट अभिषेकने केले आहे.

दरम्यान गेल्या महिन्याता अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लगेच अभिषेक बच्चन यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आणि ऐश्वर्या व आराध्यालाहाी कोरोनाची लागण झाली. ऐश्वर्या आणि आराध्याने काहीच दिवसांत कोरोनावर मात केली. तर, नुकतेच बीग बीही कोरोनावर मात करून घरी परतले होते. मात्र, तरीही अभिषेक बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला नव्हता. मात्र, आज त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांनाही नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER