अभिषेक बच्चन आणि तापसी करणार एकत्र काम

Abhishek Bachchan & Taapsee Pannu

‘मनमर्जियां’ चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक संजय भंसाळी एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर काम करीत असून या प्रोजेक्टसाठी या दोघांना साईन केले जाणार आहे. गेल्या दोन- तीन वर्षांपासून संजय लीळा भंसाळी प्रख्यात गीतकार साहिर लुधियानवी आणि लेखिका, कवयित्री अमृता प्रीतम यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवण्याची योजना आखत आहेत.

साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. साहिर लुधियानवी तेव्हाही गीत लिहायचे आणि कॉलेजच्या कार्यक्रमात ते आपल्या कविता सादरही करायचे. त्यांच्या या गुणावर अमृता प्रीतम भाळल्या होत्या. ही गोष्ट अमृताच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी कॉलेजच्या प्रबंधकांवर दबाव आणून साहिर लुधियानवी यांना कॉलेजमधून बरखास्त केले होते. साहिर मुस्लिम असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता असे सांगितले जाते.

अशी ही अनोखी प्रेमकथा चित्रपटाचा विषय होऊ शकते आणि चित्रपट चालूही शकतो याची जाणीव असल्यानेच संजय भंसाळी यांनी या चित्रपटाची योजना आखली आहे. लवकरच चित्रपटातील मुख्य कलाकारांची घोषणा केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER