12 वर्षांचा अभिमन्यू यंदा ठरेल का सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर?

Abhimanyu Mishra

अभिमन्यू मिश्रा (Abhimanyu Mishra) , वय वर्ष 12 महिने 3 दिवस पण अपेक्षित यश मिळाले तर यंदा 5 सप्टेंबरच्या आधी त्याच्या नावावर विश्वविक्रम(world record) लागलेला असेल. एवढ्या कमी वयात विश्वविक्रम? आणि तो काय असेल, हा प्रश्न पडणे साहजिक आहे तर अभियन्यू मिश्रा हा बुध्दिबळपटू आहे आणि 5 सप्टेंबर 2021 च्या आधी त्याने ग्रँडमास्टरपदाचा (Chess Grandmaster) तिसरा नाॕर्म मिळवला तर तो जगातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर बुध्दिबळपटू ठरेल.

सध्या हा विक्रम युक्रेनचा सर्जी कर्जाकिन ह्याच्या नावावर आहे. सर्जी हा 12 आॕगस्ट 2002 रोजी जगातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला होता तेंव्हा त्याचे वय होते 12 वर्ष 7 महिने. म्हणजे गेल्या 19 वर्षांपासून हा विक्रम सर्जी कर्जाकिनच्या नावावर आहे. पण आता अभिमन्यू मिश्राच्या नावावर दोन ग्रँडमास्टर नाॕर्म आहेत आणि न्यू जर्सीचा हा खेळाडू तिसऱ्या ग्रँडमास्टर नाॕर्मपासून फक्त 29 एलो पाॕईंट दूर आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये ‘अभि’ सर्वात कमी वयाचा इंटरनॅशनल मास्टर ठरला होता. त्यावेळी त्याचे वय फक्त 10 वर्ष 9 महिने आणि 3 दिवस होते.

अभिमन्यूची जन्मतारीख 5 फेब्रुवारी 2009 आहे आणि कर्जाकिनचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्याकडे 5 सप्टेंबरपर्यंतचा अवधी आहे. ‘अभी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिमन्यूने हंगेरीतील बुडापेस्ट येथील स्पर्धेत सोमवारी आपला दुसरा ग्रँडमास्टर नाॕर्म मिळवला.

‘अभि’ हा हंगेरीमध्ये असून येत्या काळात त्याला तिथे बऱ्याच स्पर्धा खेळायची संधी आहे. फर्स्ट सॕटरडे स्पर्धेशिवाय व्हेझरकेप्झो या मासिक स्पर्धाँतही तो सहभागी होत आहे.त्यामुळे त्याला लवकरच तिसरा ग्रँडमास्टर नाॕर्म पटकावण्याची संधी आहे. त्याचे 2601 एलो पाॕईंट झाले तर तो ग्रँडमास्टर होऊ शकतो.

याच्याआधी कर्जाकिनच्या सर्वात कमी वयात ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम मोडायची भारातीय ग्रँडमास्टर गुकेश दोम्माराजूला संधी होता पण तो फक्त 17 दिवसांच्या अंतराने कर्जाकिनपेक्षा मोठा ठरला होता.

सर्वात कमी वयाचे ग्रँडमास्टर

1) सर्जी कर्जाकिन (युक्रेन) – 12 वर्ष 7 महिने
2) गुकेश दोम्माराजू (भारत)- 12 वर्ष 7 महिने 17 दिवस
3) जोव्होखीर सिंदारोव्ह (उझबेकिस्तान)- 12 वर्ष 10 महिने 5 दिवस
4) प्रज्ञानंद रमेशबाबू (भारत)- 12 वर्ष 10 महिने 13 दिवस
5) नोदीर्बेक अब्दुसत्तारोव्ह (उझबेकिस्तान)- 13 वर्ष 1 महिना 11 दिवस
6) परिमार्जन नेगी (भारत)- 13 वर्ष 4 महिने 22 दिवस
7) मॕग्नस कार्लसन (नाॕर्वे)- 13 वर्ष 4 महिने 27 दिवस
8) वेई यी (चीन)- 13 वर्ष 8 महिने, 23 दिवस
9) रौनक सिधवानी (भारत)- 13 वर्ष 9 महिने 28 दिवस
10) बू झियांग्झी (चीन)- 13 वर्ष 10 महिने 13 दिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button