अभिज्ञा ला मिळाला नवा जोडीदार

Abhijna got a new partner

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या येऊन धडकत आहेत .काहीजणींचे लग्न ठरले तर काहीजणींना मूहुर्त देखील मिळाला आहे, तर काही जणींनी लवकरच आपण दोनाचे चार हात करत असल्याच्या बातम्या सोशल मीडिया वरून शेअर करायला सुरुवात केलीय. याच पंक्तीत आता अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhijna Bhave) हिला देखील तिच्या आयुष्याचा जोडीदार सापडला असून लवकरच आम्ही लग्न करणार असल्याचं तिने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

लगोरी.. मैत्री रिटर्न (Lagori .. Maitri returns) या मालिकेतून अभिज्ञा भावे छोट्या पडद्यावर झळकली होती. त्याच्या नंतर वेगवेगळ्या मॉडेलिंग आणि निवेदनामध्ये अभिज्ञा आपल्याला नेहमीच दिसली.

खुलता कळी खुलेना या मालिकेत साकारलेली खलनायिका हा पण तिचा धाडसी निर्णय होता .कारण एकीकडे मालिकांमध्ये नायिका होण्यासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्री मध्ये करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच अभिज्ञाने खलनायिका बबूनही चाहत्यांची पसंती मिळवली. तुला पाहते रे या मालिकेतही तिच्या भूमिकेला ग्रे शेड होती. सुबोध भावे आणि गायत्री दातार या दोघात तिसरी अशी व्यक्तिरेखा असलेल्या मायराच्या भूमिकेला अभिज्ञाने चांगलाच न्याय दिला.

खूप कमी जणांना माहिती आहे कि अभिज्ञा ही अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एअर होस्टेस होती मात्र त्यानंतर तिने अभिनयातच जम बसवला आहे. गेल्याच आठवड्यात तिने तिच्या सोशल मीडिया पेजवर लवकरच लग्न करते आहे असा मेसेज पोस्ट केला आहे यामध्ये तिने तिच्या जोडीदारासोबत अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो साखरपुड्याचे असल्यामुळे मेहुल याच्यासाठी ‘माझा साखरकारखाना’ अशी गोड कॅप्शनही तिने या फोटोला दिली आहे. तिच्या होणार्‍या नवऱ्याचं नाव मेहुल पै असून तो उद्योजक आहे.

अभिज्ञा भावेचे वरूण वर्टीकर याच्यासोबत लग्न झालं होतं मात्र ते फार दिवस टिकू शकलं नाही. त्यानंतर अभिज्ञा सिंगल होती आता तिच्या आयुष्यात मेहुल आल्यामुळे ती खूप खुश असल्याचे फोटोवरून दिसत आहे. सध्या तरी आम्ही लग्न करायचं ठरवलं असलं तरी प्रत्यक्ष डोक्यावर अक्षता पडण्यासाठी आम्हाला अजून एक वर्ष थांबण्याची इच्छा आहे असे या दोघांनी ठरवले असल्यामुळे अभिज्ञाला वधू रुपात पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या तिच्या चाहत्यांना पुढच्या वर्षी पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मालिका नाटक तसेच काही सिनेमांमधून नेहमीच अभिज्ञा प्रेक्षकांसमोर आली आहे. तिसरे बादशाह हम या नाटकात मयुरी देशमुख आणि सुनील बर्वे यांच्यासोबत दिसली आहे. सध्या या नाटकाचे प्रयोग करोनामुळे बंद आहेत.

अभिज्ञाबाबत अजून एक सांगायचं तर तिला खूप छान फॅशन सेन्स आहे. मॉडर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही फॅशन मधून एक वेगळाच स्टाइल स्टेटमेंट करण्यामध्ये तिची कल्पकता खूप चांगली आहे. अभिनेत्री

अश्विनी पंडित अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोघींनी मिळून चालवलेल्या फॅशन ब्रँडला सेलिब्रेटिंग सह अनेक तरुण-तरुणींच्या देखील अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. अभिनेत्री तेजस्विनी आणि अभिज्ञा या दोघींच्या नावातूनच त्यांनी त्यांच्या ब्रँडला तेजाज्ञा असं नाव दिलं आहे. त्यात त्यांचे अनेक ड्रेस साड्या सेलिब्रिटींच्या खरेदीला सेलिब्रिटी खरेदी करत असतात. प्रदर्शन आणि स्टॉलच्या माध्यमातून तेजाज्ञा ब्रँडसाठी अभिज्ञा तिचं फॅशन कौशल्य दाखवत आहे .

पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्यानंतर अभिज्ञा डिप्रेशनमध्ये गेली होती मात्र पुन्हा तिने स्वतःला खंबीर बनवत अभिनय माध्यमातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेत तिने मेहूलला पसंत केले आहे.

दरम्यान, विणकाम, रंगवलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या, जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या कलाकृती, चित्रं अशा विविध कलाकृती सध्या अभिज्ञा भावेच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर झळकत आहेत.पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारा वस्तूंचा पुनर्वापर यातून पाहायला मिळतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER