अभिजित बोलला आणि एक मुलगी कॅन्सरमुक्त झाली

abhijit khandkekar

आपण नेहमी बघतो की एखाद्या कलाकाराचा प्रभाव अनेक चाहत्यांवर असतो. सेलिब्रिटी कलाकार जे सांगतात ते ऐकण्यासाठी त्यांचे कान टवकारलेले असतात. परंतु एखाद्या कलाकाराच्या सांगण्यामुळे एखादी कॅन्सर ग्रस्त मुलगी कॅन्सरमुक्त होऊ शकते आणि या गोष्टीचा त्या कलाकारांना देखील खूप आनंद होऊ शकतो. असंच काहीसं घडलं आहे अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijit Khandkekar) याच्या आयुष्यात. एक कलाकार म्हणून एखाद्याचा जीव वाचवू शकलो हे समाधान आयुष्यात कधीही विसरण्यासारख नाही असं तो आवर्जून सांगतो.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून गुरुनाथ सुभेदार ही भूमिका अभिजीत खांडकेकर साकारत आहे . खरेतर पडद्यावरच्या गुरुनाथचा प्रेक्षकांना प्रचंड राग यावा अशी त्यांची भूमिका आहे. परंतु अभिजीत खांडकेकर एक कलाकार म्हणून त्याच्या आयुष्यात किती संवेदनशील आहे याची प्रचिती त्याने स्वतः एका संवादातून दिली.

कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांना मानसिक धीर देण्यासाठी मुंबईत एका संस्था. काम करते या फाउंडेशन च्या संचालिकांचा एकदा अभिजीतला फोन आला. त्यांनी अभिजितला विनंती केली की आमच्या फाउंडेशन तर्फे आम्ही ज्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी काम करतो त्यातल्या एका कॅन्सरग्रस्त मुलीशी तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्ही बोलाल का? अभिजीतने लगेच होकार दिला. आणि त्या मुलीशी बोलला. पाच-दहा मिनिटांचा तो संवाद अभिजीत विसरूनही गेला.

परंतु दोन महिन्यानंतर त्या फाउंडेशनच्या संचालकांचा परत अभिजीतला फोन आला आणि त्यांनी अभिजीतचे आभार मानले. ही गोष्ट तो विसरूनही गेला होता. त्याला असं वाटलं की ती मुलगी माझी चाहती असेल आणि तिला माझ्याशी बोलायचं असेल आणि त्या बोलण्यातून तिला आनंद मिळाला असेल म्हणून त्याने तो विषय सोडून दिला होता. त्या प्रसंगाविषयी अभिजीत सांगतो , संचालकांनी माझे आभार मांनल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मी स्तब्ध झालो.

अभिजीत सांगतो, त्या बाई मला असं म्हणाल्या की तुम्ही ज्या कॅन्सरग्रस्त मुलीशी दोन महिन्यापूर्वी बोलला होता ती मुलगी कुठल्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. शिवाय तिचं मानसिक धैर्य देखील खचले होते. मात्र तिच्यावर उपचार करत असताना आम्ही एक निरीक्षण असं केलं की सतत ती तुमची मालिका बघते आणि त्या मालिकेतील हिरो म्हणजे तुम्ही तिला खूप आवडता. म्हणूनच आम्ही तुमची आणि तिची फोनवर भेट घालून दिली.

त्यानंतर आम्ही असा एक प्रयोग केला की जेव्हा मी तिला औषध द्यायचे तेव्हा तिला सांगायचे की तुला जर अभिजीतला भेटायचं असेल तर हे औषध खा. तुला जर अभिजीत भेटण्याची संधी हवी असेल तर ते उपचार करून घे. फक्त ती तुम्हाला भेटायचं या आशेवर सगळे उपचार आनंदाने करून घेत राहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिची कॅन्सरची शेवटची कीमोथेरेपी संपली. शिवाय तिची मानसिक उपचाराची फाईल देखील क्लोज झाली कारण की ती पूर्ण बरी झाली.

आपल्या अभिनयाचे चाहते खूप असतात पण आपल्यातल्या कलाकार वर विश्वास ठेवणारे, फक्त आपल्या आवडत्या कलाकारांना भेटायच आहे यासाठी काहीही करणारे असे प्रेक्षक ,असे चाहते जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा खरंच खूप धन्य वाटते. अभिजीतमुळे एका कॅन्सरग्रस्त मुलीचं आयुष्य पुन्हा एकदा आनंददायी झालं.

माझिया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिजीत सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरुनाथ सुभेदार हे पात्र साकारत आहे. अभिजीत सुरुवातीला आरजे म्हणून काम करत होता. त्यानंतर महाराष्ट्राचा आवडता अभिनेता कोण याविषयी घेण्यात आलेल्या रियालिटी शोमधून अभिजीत या रुपेरी इंडस्ट्रीमध्ये आला. मध्यंतरी त्यांचे सिनेमे देखील पडद्यावर आले मात्र मोठ्या पडद्यावर त्याच्या अभिनयाची जादू झाली नाही. त्यापेक्षा जास्त पटीने तो छोट्या पडद्यावरचा हिरो म्हणून लोकप्रिय ठरला आहे. पडद्यावरचा हिरो म्हणून स्वतःला मिरवत असताना जेव्हा आपल्या हातातून एखाद्याचे आयुष्य घडते तेव्हा त्यातून मिळणारा आनंद वेगळा असतो आणि अभिजितने आयुष्यामध्ये हा आनंद कॅन्सरग्रस्त मुलीशी केलेल्या एका संवादाने त्याला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER