डॉ. अभिजित चौधरी यांच्या विश्वास मिळवा कोरोनाशी लढण्याचा’ उपक्रमाला प्रतिसाद

Abhijit Chaudhary

सांगली : वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी, आत्महत्या, युवकांमधील नैराश्‍य यावर लोकांना शास्त्रीय मदत मिळावी, या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने “विश्वास मिळवा कोरोनाशी लढण्याचा’ हा उपक्रम तसेच मानसशास्त्रीय हेल्पलाईन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी (Abhijit Chaudhary) यांनी सुरू केली आहे. या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना आपत्तीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, आजाराविषयीची वाढती भीती, समज गैरसमज, अकस्मात आजारपणामुळे निर्माण झालेला आर्थिक ताण, बेरोजगारी यामुळे लोकामध्ये मानसिक आजारपण वाढत आहे. लोकांचे भावनिक व मानसिक प्रश्न कमी होतील. आजारपणामुळे खचलेल्या कुटुंबांना तज्ज्ञ व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल. तज्ज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील या क्षेत्रामध्ये 17 वर्षे कार्यरत असणाऱ्या शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेची नियुक्ती केली आहे. मानसिक आरोग्य प्रबोधन, जाणीव जागृती व कोविड रुग्ण व नातेवाईकांना मानसीक आधार, प्रथोमोपचार करण्याचे काम ही संस्था करत आहे.

जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व मानसतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 9 ते रात्री 9 अशी हेल्पलाईन सुरू असेल. तसेच ऑनलाईन समुपदेशन, वेबिनार या माध्यमातून मानसतज्ज्ञ कार्यरत असणार आहेत. जिल्ह्यातील कोव्हिड सेंटर, कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण, नातेवाईक, संशयित रुग्ण यांना मानसीक आधार देण्याचे व प्राप्त परस्थितीत धैर्याने उभे राहण्यासाठी मानसतज्ञ समुपदेशन सेवा देत आहे. कोव्हिड आजाराची भीती, झोपेच्या तक्रारी, विचारचक्र, ताण -तणाव, निराशा, अशा मानसिक समस्यासाठी18001024710/9422627571 या मोफत हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER