आदित्य ठाकरेंविरुद्ध विधानसभा लढणारे अभिजित बिचुकले पदवीधर निवडणुकीत

abhijeet-bichukale-Aaditya Thackeray

पुणे : राष्ट्रपतिपद, लोकसभा आणि विधानसभा अशा जवळपास प्रत्येक निवडणुकीत नशीब आजमावणारे ‘बिग बॉस’ (Big Boss) फेम अभिजित बिचुकले यांनी आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अभिजित बिचुकले (Abhijeet bichukale) यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर राज्यात पुन्हा एकदा अभिजित बिचुकले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे अभिजित बिचुकले त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. त्यामुळे यंदा पुणे पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. मी प्रत्येक निवडणुकीत का हरतो, याचे उत्तर जनतेने द्यायला पाहिजे. माझा चाहतावर्ग मला कायम पाठिंबा देतो. मात्र, पैसा आणि सत्तेच्या ताकदीपुढे माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळे आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये माझा पराभव झाला. मात्र, आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी माझा गांभीर्याने विचार करावा. मी तरुणांच्या शिक्षण आणि नोकऱ्यांच्या मुद्द्यांना प्राधान्य देईन. मतदारांनी मला एकदा संधी देऊन पाहावी, असे आवाहन अभिजित बिचुकले यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER