‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना !’ अतुल भातखळकरांचा सचिन सावंतांना टोमणा

SAchin sawant & Atul Bhatkalkar

मुंबई : अभिनेता सुशांत सिंहच्या (Sushant Singh Rajput) संशयास्पद मृत्यूवरून राजकीय गदारोळ सुरूच आहे.  आज सुशांतचा विसेरा रिपोर्ट आला. त्यानंतर काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपावर (BJP) टीका केली. त्याला उत्तर देताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सावंतांना  टोमणा मारला – बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना.

एस्मचा अहवाल आल्यानंतर सचिन सावंत म्हणाले की, भाजपाला झटका बसला आहे. याला उत्तर देताना अतुल भातखळकर म्हणाले – मला कळत नाही की त्यांना एम्सचा अहवाल कोणी सांगितला. “बिहारमध्ये काँग्रेसचे लोक स्वत: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करत होते.

त्यामुळे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी  परिस्थिती काँग्रेस प्रवक्त्यांची झाली आहे. ” असं म्हणत भातखळकरांनी सचिन सावंत यांना उत्तर दिलं. तसेच, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल असंही त्यांनी म्हटलं.

व्हिसेरा रिपोर्ट सीबीआयला दिला

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने त्यांचा अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषकण आढळले नाहीत.

सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट एम्सकडून सोमवारी (२८ सप्टेंबर) सीबीआयच्या सुपूर्द करण्यात आला. सुशांत आत्महत्याप्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने, त्याच्यावर विषप्रयोग केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या तपासाकरिता एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट सादर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER