अब्दुल सत्तार अपक्ष लढणार; औरंगाबाद काँंग्रेसमध्ये बंड

Abdul Sattar will fight for Independent,Congress is quite shocked

औरंगाबाद :काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाचे आमदार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला विरोध करत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घोषित केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. शुक्रवारी उशिरा काँग्रेसने उमेदवारी यादी जाहीर केली.

त्यात राज्यातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. यात औरंगाबाद येथून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळाली आहे. यामुळे आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले आहेत.अब्दुल सत्तार हे औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्या दोघांमध्ये वाद आहे.

सत्तार यांचा आरोप आहे की, झांबड यांच्या उमेदवारीबाबत मला विश्वासात घेतले नाही. औरंगाबादच्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही इच्छुक होती. राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू होते; पण काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला होता.