प्रसिद्धीसाठी पुड्या सोडतात; अब्दुल सत्तार यांचा राणेंना टोमणा

Narayan Rane - Abdul Sattar

सावंतवाडी :- माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना आता काही काम उरले नसल्याने ते प्रसिद्धीसाठी पुड्या सोडण्याचे काम करत आहेत, असा टोमणा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आंबोली येथे पत्रपरिषदेत मारला.

राणेंवर टीका करताना ते म्हणालेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे ज्या भाषेत टीका करत आहेत, ती भाषा निषेधार्ह आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. राणे याना आता काहीही काम उरले नाही. प्रसिद्धीसाठी ते पुड्या सोडतात.

हे सरकार पूर्ण काळ चालेल, असा विश्वास व्यक्त करताना सत्तार म्हणाले – आमचे सरकार ३२ तारखेला पडेल! विरोधकांना आता कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्याने ते पाडापाडीचे राजकारण करत आहेत. पण त्यांना यश येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER