शरद पवारांकडे ‘हर मर्ज की दवा’ म्हणून राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला : अब्दुल सत्तार

Abdul Sattar-Raj Thackeray.jpg

मुंबई : राज्यपाल यांच्या भेटीवर मार्मिक भाष्य करत शिवसेनेच्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) टोला लगावला आहे .राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल.

म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, अशी मिस्कील प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असेही सत्तार यावेळी म्हणाले. शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है.

शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. ते शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER