विखे पाटील शिवसेनेच्या वाटेवर? सत्तार यांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

अहमदनगर :- भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याचे कारण म्हणजे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेले विधान. प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले की, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेने मोठी ऑफर दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) हे अनुभवी राजकीय नेतृत्व आहे.त्यांच्या अनुभवाची राज्याला गरज असून त्यांनी शिवसेनेत यावं, असं आवाहन करत राजकीय ऑफर सत्तार यांनी दिली. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूरमध्ये एकाच मंचावर आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे वक्तव्य केलं.

अब्दुल सत्तार म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील अनुभवी राजकीय नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाची आणि अनुभवाची महाराष्ट्र राज्याला नितांत गरज आहे. विखे पाटलांनी शिवसेनेत यावं. मात्र सत्तार यांनी ऑफर दिली असली तरी राधाकृष्ण विखे यांनी मात्र अब्दुल सत्तार आणि आपल्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले, अब्दुल सत्तार आणि माझी पक्ष विरहीत मैत्री आहे. अनेक वर्षापासुन ते माझे चांगले स्नेही आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही.

दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीचं कारण अद्यापही कळू शकलेले नाही. मात्र सत्तार यांनी विखेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : एनसीबी ड्रग्स तस्करांना वाचवून मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करतोय – नवाब मलिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER