राज्यमंत्री बच्चू कडूंचा अब्दुल सत्तारांना ‘हा’ सल्ला !

Abdul Sattar-Bacchu Kadu

अमरावती : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये इतर घटक पक्षदेखील आहेत. त्यामुळे पद कोणते मिळाले याकडे लक्ष न देता काम कसे करता येईल, याकडे अब्दुल सत्तार यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना दिला आहे.

अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. नंतर शिवसेनेकडून त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होऊन खातेवाटपापूर्वीच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.

अब्दुल सत्तार शब्द पाळणारे नेते, शिवबंधन तोडणार नाहीत – संजय राऊत

याबाबत विचारता आज शनिवारी एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची अद्यापही स्पष्ट माहिती मला नाही.

मात्र, त्यांची राजीनामा द्यायची इच्छा असेल, तर त्यांनी घाई करू नये. पदापेक्षा काम महत्त्वाचे आहे! सत्तार हे शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून ते शिवसेनेत आले होते, तर ‘प्रहार’ संघटनेचे नेते असलेले बच्चू कडू यांची यंदा राज्यात पहिल्यांदा मंत्रिपदी वर्णी लागली आहे.