शिवसेना मंत्र्याला शिविगाळ करणे भाजप पदाधिकाऱ्याला महागात पडले, गुन्हा दाखल

Shiv Sena- BJP

औरंगाबाद : शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, भाजपच्या (BJP) पदाधिका-यांवर वेळीच तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण –

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. भाजपने सिल्लोड नगर परिषद आणि राज्यमंत्री सत्तार यांच्या विरोधात औरंगाबाद-जळगाव महामार्गावर आज सकाळी आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी मात्र, भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तोल सुटला. रास्ता रोको आंदोलनातच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घडलेल्या या प्रकारानंतर बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे यांनी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना शिवीगाळ करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांसमवेत एका माहिती अधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगराध्यक्ष कमलेश कटारिया, अमोल ढाकरे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER