माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या : अब्दुल सत्तार

Abdul Sattar

औरंगाबाद: मी राजीनामा दिलेला नसून, माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या, असे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. आज शनिवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना सत्तार यांनी हा दावा केला.

मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आज सकाळपासून पसरले होते. सत्तार यांच्या नाराजी-नाट्याचा फटका शिवसेनेला आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही बसला, हे येथे उल्लेखनीय.

सत्तारांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत भडका; ‘हे’ नेते संतापले

सुमारे नऊ तासांनंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी सत्तार म्हणाले, सर्व प्रश्नांची उत्तरे मी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर देणार आहे. ज्यांनी माझ्या राजीनाम्याच्या बातम्या दिल्या, त्यांनाच मी राजीनामा दिला की नाही, ते विचारा!

माझ्यावर ‘मातोश्री’चा कंट्रोल आहे, असेही ते म्हणाले. आपण आज रात्री मुंबईला जाणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.