अब्दुल कलामांना नरेंद्र मोदींनीच राष्ट्रपती केले : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - A. P. J. Abdul Kalam - Narendra Modi

पुणे :- भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुन्हा एकदा वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच राष्ट्रपती केले. असा दावा पाटील यांनी केला आहे. भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केले. सर्व मुस्लिमांना नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले. अब्दुल कलामांनादेखील त्यांनी राष्ट्रपती केले. ते मुस्लीम होते म्हणून बाजूला ठेवले नाही. कर्तृत्ववान आणि संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रपती केल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंतप्रधान यांनी मुस्लिम महिलांच्या पायातल्या बेड्या तोडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा केला. बिहारमध्ये निवडणुकादरम्यान विजय मिळाला त्याचे विश्लेषण करा. मुस्लिम महिलांनी मोदींना मतदान केले. बिहारमध्ये मुस्लिम भागात २९ पैकी १४ जागांवर भाजपला विजय मिळाला. त्या महिलांनी पतींना सांगितले की, मोदींनाच मतदान करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी यासारख्या महापुरूषांचे कर्तुत्व समजून घेण्याची गरज आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले पाहिजे याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. तरूणांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते. असेच योगदान आजही युवकांनी द्यावे. या पिढीला खरा इतिहास सांगण्याचे तसेच इतिहास, राष्ट्र आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम युवा मोर्चा करत आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

ही बातमी पण वाचा : कलामांच्या राष्ट्रपती होण्याशी मोदींचा काहीही संबंध नाही , उलट …., राष्ट्रवादीचे चंद्रकांतदादांना उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER