‘एबीडी’ची सामनावीर पुरस्कारांची सिल्व्हर ज्युबिली

Maharashtra Today

मिस्टर 360 म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) ए बी डीविलियर्ससाठी (AB deVilliers) सामनावीर पुरस्कार काही नवीन नाही पण त्याच्या सामनावीर (Player of the Match) पुरस्कारांनी आयपीएलमध्ये (IPL) नवा मापदंड निर्माण केला आहे. एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता राखणारा आणि सामन्याला कोणत्याही क्षणी कलाटणी देवू शकणारा हा खेळाडू आयपीएलमध्ये तब्बल 25 व्यांदा सामनावीर ठरला आहे. मंगळवारी अहमदाबाद येथे दिल्लीविरुध्दच्या निसटत्या विजयात त्याची 42 चेंडूत 75 धावांची खेळी महत्त्वाची ठरली आणि या खेळीसह तो 25 व्यांदा सामनावीर ठरला.

या सामन्यात त्याने केवळ धावाच केल्या नाहीत तर तीन झेलसुध्दा घेतले. याप्रकारे आयपीएलच्या सामन्यात 75 धावा व 3 झेल अशी कामगिरी दोनवेळा करणारा तो एकटाच खेळाडू आहे. याच्याआधी 2019 मध्ये पंजाब किंग्जविरुध्दच्या सामन्यात त्याने अशीच कामगिरी केली होती. एबीडीशिवाय विरेंद्र सेहवाग (2011), जोस बटलर (2019), शिखर धवन (2021) या तिघांनी 75 धावा व 3 झेल अशी कामगिरी केली आहे.

तर या कामगिरीने राॕयल चॕलेंजर्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि एबीडी आयपीएलमध्ये 25 व्यांदा सामनावीर ठरला. एवढ्यावेळा आयपीएलमध्ये इतर कुणीच सामनावीर ठरलेले नाही.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर

25- ए बी डीविलियर्स
22- ख्रिस गेल
18- रोहीत शर्मा
17- डेव्हिड वाॕर्नर
17- एम.एस. धोनी
16- शेन वाॕटसन
16- युसुफ पठाण

सामनावीर पुरास्कारांत महत्त्वाचे टप्पे पहिल्यांदा कुणी गाठले ते बघू या..

5 वेळा सामनावीर – शाॕन मार्श
10 वेळा सामनावीर – युसूफ पठाण
15 वेळा सामनावीर – ख्रिस गेल
20 वेळा सामनावीर – ख्रिस गेल
25 वेळा सामनावीर – एबी डी विलियर्स

ही बातमी पण वाचा : पाच हजारी फलंदाजात ‘एबीडी’ चा स्ट्राईक रेट सर्वाधिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button