पाच हजारी फलंदाजात ‘एबीडी’ चा स्ट्राईक रेट सर्वाधिक

Maharashtra Today

ए बी डी’विलियर्स (AB de Villiers) हे नाव म्हटले की विक्रम आलेच. या लौकिकाला जागत यंदाच्या आयपीएलमध्येही (IPL) ‘एबीडी’ बरेच विक्रम करतोय. सर्वात पहिला आणि विशेष विक्रम 2008 पासून आयपीएलच्या प्रत्येक सत्रात किमान एक तरी सामना खेळलेला तो एकमेव परदेशी खेळाडू आहे.

आतापर्यंतच्या प्रत्येक आयपीएलमध्ये किमान एक तरी सामना खेळलेल्या इतर खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni), रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli), शिखर धवन, दिनेश कार्तिक, अमित मिश्रा (Amit Mishra) हे असे खेळाडू आहेत. यंदा चेन्नईने राॕबिन उथप्पाला खेळवले आणि मुंबईने पियुष चावलाला खेळवले तर तेसुध्दा या यादीत येवू शकतात पण या यादीत परदेशी खेळाडू शोधाल तर तो एकटा ए.बी. डीविलियर्सच आहे.

…तर ‘ लंबी रेस का घोडा’ असे ज्याचे वर्णन करता येईल त्या ‘एबीडी’ ने मंगळवारी दिल्ली कॕपिटल्सविरुध्द 42 चेंडूत 75 धावांची खेळी केली आणि राॕयल चॕलेंजर्सच्या फक्त एका धावेने विजयात तो सामनावीर ठरला. या खेळीदरम्यान एबीडीने आयपीएलमधील 5 हजार धावा पूर्ण केल्या आणि हा टप्पा गाठणारा तो तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला. एबीडीचा हा 161 वा डाव होता आणि त्याच्यापेक्षा कमी डावात डेव्हिड वाॕर्नर (135 डाव) आणि विराट कोहली (157) यांनी आयपीएलच्या पाच हजार धावांचा टप्पा गाठला आहे. पाच हजार धावा पूर्ण करणाऱ्या इतर फलंदाजांमध्ये सुरेश रैना, शिखर धवन व रोहित शर्मा आहेत.

5 हजार धावा करताना डावांच्या बाबतीत एबीडी हा वाॕर्नर व कोहलीच्या मागे असला तरी तो स्ट्राईक रेटच्या बाबतीत नंबर वन आहे. इतर सर्वांपेक्षा कमी चेंडू खेळून त्याने या 5 हजार धावा केल्या आहेत. ही बघा यादी…

5 हजार धावा सर्वात कमी चेंडूत..

फलंदाज———– डाव — चेंडू –

एबीडी विलियर्स – 161 – 3288
डेव्हिड वाॕर्नर —— 134 – 3554
सुरेश रैना ———- 172 – 3620
रोहित शर्मा ——– 186 – 3817
विराट कोहली —– 156 – 3827
शिखर धवन ——- 167 – 3956

एबीडीच्या आयपीएलमध्ये सिझननिहाय धावा

वर्ष —– डाव —- धावा —- स्ट्राईक रेट
2021 – 5 ——- 204 —- 174.35
2020 – 14 —– 454 —- 158.74
2019 – 13 —– 442 —- 154.00
2018 – 11 —– 480 —- 174.54
2017 – 9 ——- 216 —- 132.51
2016 – 16 —– 687 —- 168.79
2015 – 14 —– 513 —- 175.08
2014 – 13 —– 395 —- 158.63
2013 – 14 —– 360 —- 164.38
2012 – 13 —– 319 —- 161.11
2011 – 13 —– 312 —– 128.39
2010 – 7 ——- 111 —– 93.27
2009 – 13 —– 465 —– 130.98
2008 – 6 ——- 95 ——- 96.93
एकूण – 161 — 5053 —- 152.70

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button