ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधून एबी डिव्हिलियर्सने घेतली माघार

AB de Villiers

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने कोविड -१९ च्या साथीच्या आणि तिसर्‍या मुलाच्या जन्मामुळे यंदा बिग बॅश लीग (BBL) मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे परंतु भविष्यात तो ब्रिस्बेन हीटसाठी खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा ३६ वर्षीय हा खेळाडू सध्या युएईमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे.

डी व्हिलियर्स निवेदनात म्हणाला की, लवकरच माझ्या बाळाचा जन्म होणार आहे. युवा कुटुंब आणि कोविड -१९ या कारणामुळे, प्रवास आणि परिस्थितीसंदर्भातील अनिश्चिततेमुळे मी या हंगामात (बिग बॅश लीगमधील) भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तो म्हणाला की मागील हंगामात ब्रिस्बेन हीट चांगली होती आणि मी भविष्यात क्लबकडून खेळण्यास तयार आहे. आमच्या अपेक्षेनुसार संघ निकाल मिळवू शकला नाही आणि मला वाटते की काही अपूर्ण काम अद्याप बाकी आहे. बिग बॅश लीग ३ डिसेंबरपासून सुरू होईल.

डिव्हिलियर्स सध्या युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहे जेथे तो विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. यावर्षी त्याने आतापर्यंत ११ सामन्यांत ३२४ धावा केल्या आहेत. यावेळी, त्याची सरासरी ५४ आहे. त्याने फलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघाला बर्‍याच सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER